आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:महाविकास आघाडी सरकारचा ‘तो’ फलक हटवला

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“सरकार बदललं, पण सरकारी फलकावर मात्र ठाकरेच मुख्यमंत्री, पवार उपमुख्यमंत्री!’, हे वृत्त दैनिक दिव्य मराठी २७ जुलैला प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची प्रशासनाने अखेर दखल घेऊन शासकीय विश्रामगृहासमोरील संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेला महाविकास आघाडी सरकारचा फलक हटवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन होऊन २२ दिवस होत आले असताना चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरच्या शासकीय विश्रामगृहासमोरच्या संरक्षक भिंतीवर महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने लावलेल्या सरकारी जाहिरातीच्या फलकावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री व बाळासाहेब थोरात महसूल मंत्री म्हणून आहेत. असे वृत्त २७ जुलैला प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनंतर प्रशासनाने विश्रामगृहासमोरील संरक्षक भिंतीवर लावलेला महाविकास आघाडी सरकारचा फलक अखेर हटवला आहे. मंगळवारी रात्री हा फलक प्रशासनाने हटवला आहे. दिव्य मराठीच्या वृत्ताची दखल घेत महाविकास आघाडी सरकारचा फलक प्रशासनाने हटवल्यानंतर फलकाची जागा आता कोरी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...