आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवनरोडचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद:मुळा धरणातून येणारी मुख्य लाईन नादुरुस्त; 1 लाख नागरिकांना सोसावे लागणार पाण्याचा त्रास

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहराजवळील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एक लाख लोकसंख्या असलेल्या तपोवन रोड व तपोवननगर परिसरातील पाणीपुरवठा बुधवारपासून पुढच्या तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील मुख्य पाईपलाईनला तडे गेल्याने ही पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे.

अहमदनगर शहरापासून जवळ असलेल्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या एक लाख लोकसंख्येच्या तपोवन रोड परिसरातील पाणीपुरवठा पुढच्या दोन दिवसासाठी बंद राहणार असून, या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील मुख्य पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 1 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे फटका बसणार आहे.

यापूर्वीही खंडित झाला होता पाणीपुरवठा

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत यापूर्वी तीन वेळा थकित वीज बिलामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी इंजिनचे ऑइल संपल्यामुळे देखील या भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. या भागात मीटरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, नियमित पाणीपट्टी भरूनही या भागातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही.

बातम्या आणखी आहेत...