आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपची मुख्य ताकद संघटनेत आहे, प्रत्येक बुथवर प्रभावी काम हा त्याचा मुख्य गाभा आहे. हे संघटन २४ तास कार्यरत आहे. देश प्रथम हे धोरण, प्रखर देशप्रेम ही ओळख आणि घराणेशाहीमुक्त पक्ष. पक्षाच्या स्थापनेपासून अनेक स्थितांतरी पाहिली आहे. शेवटच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे, ही पक्षाची भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी बुधवारी केले.
भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त शहर जिल्हा भाजपच्या वतीने गांधी मैदान येथील कार्यालयात भारत मातेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, सुरेखा विद्ये, मालन ढोणे आदी यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने खऱ्या अर्थाने पक्षाच्या अंत्याेदय मुल्यांवर ठाम राहत देशातील तळागळापर्यंतच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याची शिकवण पक्षाला आज जगात नंबर एकचा पक्ष बनविले आहे. यापुढेही अशीच घौडदोड सुरु राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक म्हणाले, भाजपाच्या वर्धापन दिनानिमित शहर भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम, भारत माता प्रतिमा पूजन, ध्वजारोहण, यानंतर शहरातून बाईक़ रॅली काढण्यात आली. शक्ती केंद्र प्रमुखांच्या निवासस्थानी नामफलक लावण्यात आला, अशी विविध कार्यक्रम झाले.
यावेळी वसंत राठोड, ज्योती दांडगे, महेश तवले आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले. आभार तुषार पोटे यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र बारस्कर, भय्या परदेशी, पल्लवी जाधव, उपाध्यक्ष संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, मंडल अध्यक्ष अजय चितळे, वसंत राठोड, बाळासाहेब गायकवाड, सचिन पारखी, महेश तवले, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, अमोल निस्ताने, सुमित बटुळे, अनिल गट्टाणी, बंटी ढापसे, प्रशांत मुथा, मिलिंद भालसिंग, अनंत जोशी, अजय ढोणे, पंकज जहागिरदार, जगन्नाथ निंबाळकर, अभय भळगट, मंगेश खंगले, मिनीनाथ मैड, विजय घासे, अशोक भोसले, महावीर कांकरिया, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, सिद्धेश नाकाडे, छाया रजपुत, लिला आगरवाल, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, रेखा मैड, संध्या पावसे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.