आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवाना:मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी  नगरचा मल्लखांब संघ जळगावला रवाना

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथे महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचा मुलींचा संघ रवाना करण्यात आला.

अश्विनी दासरी, गौरी गौड, स्नेहल भोसले, प्राची खळेकर, वैष्णवी डोके, व गौरी चौरे यांचा संघात समावेश आहे. संघासमवेत महिला प्रशिक्षक म्हणून प्रणिता तरोटे आहेत. संघातील खेळाडूंना संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजकुमार धोत्रे, सचिव अनंत रिसे, सहसचिव मोहनीराज लहाडे व अजित लोळगे यांनी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना संघटनेचे उपाध्यक्ष नंदेश शिंदे, खजिनदार होनाजी गोडाळकर, तांत्रिक समिती अध्यक्ष निलेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. जळगावमधील स्पर्धेसाठी पंच म्हणून नगर जिल्ह्यातर्फे अमित जिन्सीवाले व उमेश झोटिंग यांना महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक संघटनेच्या वतीने आमंत्रित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...