आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय सैन्य दलात मराठा बटालियनची गौरवशाली परंपरा आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात २१६ मीडियम रेजिमेंटच्या सैनिकांनी अभूतपूर्व पराक्रम केला होता. देशसेवेच्या कार्यात सैनिकांचे मोठे योगदान असल्याचे सांगताना, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी २१६ मीडियम रेजिमेंटच्या स्थापना दिनानिमित्त सर्व आजी-माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील हॉटेल संजोग येथे नगर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचा मेळावा व २१६ मीडियम रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यावेळी अधीक्षक राकेश ओला बोलत होते. कर्नल व्ही. डी. पोट्टी, कर्नल वेणुगोपाल, कर्नल डॉ. मोहन रोटे, व्ही. के. शर्मा, कॅप्टन के. एन. गिरी, सुभेदार मेजर एन. के. पाटील, एन. के. पाटील, सुभेदार मेजर के. व्ही. भोसले, कॅप्टन गंगाधर चेमटे, शिवाजी गिरवले आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली. या कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांचा उस्फूर्त सहभाग होता. देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा आजी माजी सैनिक संघटना, ऑडनरी गंगाधर चेमटे, शिवाजी गिरवले, घन:शाम खराडे, आदिनाथ फासले, भरत खाकाळ, राजेंद्र जगताप, नंदकुमार साठे, सुनील तारडे, दुर्योधन जाधव, दिनकर गर्जे, अशोक कार्ले आदींसह आजी-माजी सैनिकांनी परिश्रम घेतले.
आता परिवाराला वेळ द्या : पोट्टी सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा. सैन्य दलात सेवेत असताना, परिवाराला वेळ देता आला नाही. ज्या ठिकाणी नोकरी करीत आहात, तेथे देशाच्या गौरवासाठी कार्य करा व जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन कर्नल व्ही. डी.पोट्टी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.