आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Meaning Of Life Through Education Is The Teachings Of Mahatma Phule, Greetings To Krantisurya Mahatma Jotiba Phule In The City; Health Camp On Behalf Of The Festival Committee | Marathi News

जयंती:शिक्षणामुळे जीवनाला अर्थ हीच महात्मा फुलेंची शिकवण, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना शहरात अभिवादन; उत्सव समितीच्या वतीने आरोग्य शिबिर

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, मग ते कुठल्याही प्रकारचे शिक्षण असू द्या. माणसाचं वागणं, बोलणं चांगलं असणे गरजेचे आहे आणि या सर्व गोष्ट शिक्षण घेतल्यावरच समजतात. शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली, अशा शब्दात विविध संस्था, संघटनातर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना शहरात जयंतीनिमित्त अिभवादन करण्यात आले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटनांतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. तर महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.

मागास समाजातील मुला-मुलींना मिळवून दिला शिक्षणाचा हक्क: साठे
महात्मा जोतीबा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपण त्यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणणे गरजेचे आहे. त्या काळात त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव, सम-विषम ही प्रस्तावना, जाती आणि धर्म यावरुन लोकांमध्ये वादविवाद व्हायचे ते मिटवून टाकण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणावर जोर दिला, त्यामुळे मागासलेल्या मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क त्यांनी मिळवून दिला, असे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी केले.

सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील पोलिस चौकीसमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नंदू वाघमारे, अशोक औटी, देवीदास भालेराव, सचिन पाटील, आजीनाथ थोरवे, प्रकाश जाधव, अ‍ॅड.योगेश गुंजाळ, रोहन परदेशी, विकास हिवाळे, सुशिल साळवे, अजय आगवान, प्रमोद आढाव, मनेष कांबळे, भाऊ साळवे, मनिष त्रिभुवन, अशोक देवढे, बबन गाडे, कारभारी कराळे, उर्किडे काका उपस्थित होते.

महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशमार्ग दाखवला : सचिन जगताप
महात्मा फुले यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून विकासाचा प्रकाशमार्ग दाखवला. सावित्रीबाईंच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. फुले दाम्पत्याने शिक्षणाची दारे उघडी करुन समाजात क्रांती घडवली, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी केले. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संपत शिंदे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक बाबर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर आदी उपस्थित होते.

समता परिषदेतर्फे अिभवादन
महात्मा फुले समता परिषद व नंदनवन मित्र मंडळाच्यावतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव,नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, अण्णा घोलप आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेविका सुवर्णा जाधव म्हणाल्या, महात्मा ज्योतिबा फुले हे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. तत्कालीन समाजातील अनिष्ठ रुढी-परंपरांना विरोध करत सर्वांना समभावाची वागणुक देणार्‍या समाजाची निर्मिती केली. दुर्लक्षित घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत त्यांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. नंदनवन मित्र मंडळाच्यावतीनेही राष्ट्र पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचा काम कृतीतून करण्यात येत असल्याचे सांगितले.

फुले यांचे कार्य दिशादर्शक : कदम
तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध महात्मा फुले यांनी साहित्यातून व्यथा मांडल्या. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहेे, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेनेच्यावतीने जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम नळकांडे, नगरसेविका सुवर्णा जाधव, सुप्रिया जाधव, दत्ता कावरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, संदिप दातरंगे, गौरव ढोणे, अण्णा घोलप, संजय आव्हाड आदि उपस्थित होते.

समाजासाठी जीवन समर्पित करणारे थोर पुरुष : गंधे
महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्त्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडवले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. त्यांचे कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी केले.

माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भाजपतर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, मनेष साठे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उपाध्यक्ष संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, अनिल सबलोक, अजय चितळे, सचिन पारखी, ज्ञानेश्वर काळे, जगन्नाथ निंबाळकर, मयुर ताठे, दत्ता गाडळकर, वसंत राठोड, अजय ढोणे, अमोल निस्ताने, मिलिंद भालसिंग, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटुळे, अशोक भोसले, अ‍ॅड.राहुल रासकर आदि उपस्थित होते.

मोफत रक्त व नेत्रतपासणी
महात्मा फुले जयंतीनिमित्त उत्सव समितीच्यावतीने आयोजित आरोग्य शिबीराचे उद्घाटन विशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात मेट्रो पोलिस लॅबच्यावतीने मोफत रक्ततपासणी, आनंदऋषिजी हॉस्पिटलच्यावतीने मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. या शिबिरात डॉ.श्रीधर बधे, डॉ.संतोष पालवे, डॉ.विशाल खराडे, डॉ.स्नेहा खराडे, डॉ.राहुल हजारे, डॉ.संदीप नगरे, डॉ.निनाद गाडेकर, डॉ.अमोल जाधव, डॉ.मनिष खरपुडे, डॉ.अभिजित शिंदे, डॉ.अभिजित बोरुडे, डॉ.केतन गोरे, डॉ.शाम गायकवाड आदिंनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात असंख्य रुग्णांनी या सर्वरोग तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य पणाला लावले : मुदगल
महात्मा फुले यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य पणाला लावले. आजच्या युवकांनी फुले यांचे कार्य आत्मसात करावे, असे प्रतिपादन बाळासाहेब मुदगल यांनी केले. मनपा कर्मचारी पतसंस्थेतर्फे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बाळासाहेब गंगेकर, प्रमिला पवार, जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सतिष ताठे, विकास गिते, किशोर कानडे, विजय कोतकर, अजय कांबळे, कैलास चावरे, उषाताई वैराळ,शेखर देशपांडे उपस्थित होते.

महात्मा फुलेंनी केले समाज सुधारणेचे काम
महात्मा फुले लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करुन शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी त्याकाळी समाज सुधारणेचे केलेल्या कार्यामुळेच आज समाजात बंधूभाव निर्माण होऊन समाज प्रगती साधत आहे. '' रोहिणी शेंडगे, महापौर.

महात्मा फुलेंमुळेच महिलांना समाजात सन्मान
अिनष्ठ रुढी आिण पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान नव्हते. महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला. आज विविध क्षेत्रात स्त्रिया आपले कर्तृत्व गाजवत आहेत, याचे श्रेय महात्मा फुले यांनाच जात असल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी सांगितले.

अनिष्ठ रुढी, परंपरा यांना फाटा दुर्लक्षित समाजाला दिशा दिली
महात्मा जोतीबा फुले यांनी त्या काळी अनेक विरोध पत्करुन जे समजोन्नत्तीचे काम केले ते आजही सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे. समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा यांना फाटा देत दुर्लक्षित समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांचा आदर्श आपण घेऊन समाजात काम केले पाहिजे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केले.

आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतिकारक म्हणून ओळख
आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतिकारक म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जातात. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. शिक्षण व समता या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते, असे माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले.