आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजि. प. कर्मचारी सोसायटीच्या रविवारी (५ जून) होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत पोटनियम दुरूस्तीचा विषय गाजणार आहे. सभासदांसाठी १० टक्के लाभांशाची शिफारसही केली आहे. परंतु, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत, सत्ताधारी मंडळ धुळफेक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे रविवारी (५ जून) होणारी सभा विविध मुद्द्यांवर गाजण्याची चिन्ह आहेत.
संस्थेचे चेअरमन विलास शेळके म्हणाले, २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात तरतुदी व कायम निधीवरील व्याजाची रक्कम वजा जाता २ कोटी ९३ लाख ४६ हजारांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर असणार आहेत. सभेत १० टक्के लाभांशाची शिफारस केली. कायम निधी वरील व्याज ९ टक्के देणार असल्याचे सांगितले. सभेत पोटनियम दुरुस्तीचा विषय ठेवण्यात आला आहे. डिव्हिडंड व व्याजाची रक्कम सभेनंतर खात्यावर जमा करणार असल्याचे व्हा. चेअरमन काशिनाथ नरोडे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेत सभासदांच्या गुणवंत मुलांना गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक संजय कडूस यांनी दिली.
दरमहा ५०० रुपये कायम ठेवीचा घाट
यंदाचा १० टक्के अत्यल्प लाभांश आहे. आम्ही १२ ते १५ टक्क्यांपर्यंत लाभांश देऊन कायम ठेवीवर १० टक्क्यांवर व्याज दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी ठेवीवरील व्याजदर साडेसात टक्के ठेवला. सभासद कल्याण निधी वर्षात एकदाच १८०० ते २००० हजार जमा करत होतो, पण सत्ताधाऱ्यांनी दरमहा ५०० रूपये घेण्याचा घाट घातला. वर्ग ४ सभासदाला अडचणीचा ठरणार आहे. सत्ताधाऱ्यांचा कारभार ूळफेक करणारा आहे'' सुभाष कराळे, नेते, विरोधी मंडळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.