आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले; गुन्हा दाखल

राहुरी शहर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना १४ जून रोजी राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली. या घटनेबाबत विशाल भोसले याच्या विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण करण्यात आलेली ती १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मानोरी परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहते.

१४ जून रोजी रात्री साडेनऊ ते १५ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला पळवून नेल्याचे सकाळी उठल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी त्या मुलीचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भोसले, (वय २४ वर्ष, रा. खंडेश्वरीनगर, ता. जि. बीड) याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...