आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस छोडोचाच कार्यक्रम जोरात:अस्तित्वासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला जनाधार नाही; राधाकृष्ण विखे यांची टीका

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. अस्तित्वासाठी काँग्रेसने आंदोलन सुरू असले तरी, जनाधार कुठेही नाही.प्रसिध्दी मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पदयात्रेपेक्षा काँग्रेस छोडोचाच कार्यक्रम संपूर्ण देशात जोरात सुरू आहे.अशी टीका महसूल दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी केली.

कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल विखे यांचा अहमदनगर तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, खासदार.डॉ. सुजय विखे , तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे ,सरपंच विजय शीलमकर, अक्षय कर्डीले, संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डीले, अविलाश घिगे आधी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे देशात मोफत लसीकरण झाल्याने भारत देश पुन्हा उभारी घेवून वाटचाल करत आहे. असे विखे यांनी सांगितले. राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल -डिझेलवरील कर माफ केले नाहीत.पण दारू स्वस्त केली.आज महागाईच्या कारणाने आंदोलन करणारे सतेत असताना जनतेला दिलासा देऊ शकले नाहीत. असा आरोप विखे यांनी यावेळी केला.

तीन मंत्री असतानाही विकास काम नाही

राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारने काय दिले असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर दिसत होते.माझे कुटूंब तुमची जबाबदारी असा एकमेव कार्यक्रम सुरू होता.अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री होते, परंतू अडीच वर्षात एकही विकास काम होवू शकले नसल्याची टिका मंत्री विखे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...