आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत काँग्रेसने आसूड मोर्चा, स्वाक्षरी मोहिमा, आंदोलने, उपोषण, खड्डे फोटो संकलन मोहिम राबवत थेट मुंबईच्या आझाद मैदानात खड्ड्यांच्या दुरावस्थेचे प्रदर्शन भरवले. मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली. काँग्रेसच्या या दणक्यामुळेच खासदारांना याच प्रश्नावर मुंबई गाठावी लागली, असा दावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
खासदार सुजय विखे यांनी शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटींची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. त्यावर बोलताना काळे यांनी रस्त्यांची दुरवस्था पाहता २५ ऐवजी ५० कोटींची मागणी करायला हवी होती, असे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या ३०० कोटींच्या फसव्या घोषणेप्रमाणे गाजर दाखवून नगरकरांची चेष्टा करू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरकरांच्या या प्रश्नासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रशासन, शासन दरबारी केलेला पाठपुरावा, जनतेत जात घेतलेली जनआंदोलनाची भूमिका यातून लोकप्रतिनिधींवर नगरकरांचा दबाव निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, असे काळे यांनी म्हटले आहे.
खासदारांची दिल्लीत घुसमट होत आहे. त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत नगर शहरातून स्वतःची उमेदवारी करण्यासंदर्भात चाचपणी केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यासह शिवाजी कर्डिले यांना पाडण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मोठी नाराजी असल्याने ते आता भाजपाकडून शहरातून विधानसभा निवडणूक लढवतील, असा दावा किरण काळे यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.