आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:थकबाकीपोटी दोन‎ गाळ्यांना महापालिकेने‎ ठोकले टाळे‎

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ताकर व पाणीपट्टीच्या‎ थकबाकीपोटी महानगरपालिकेच्या‎ सावेडी प्रभाग कार्यालयाने दोन‎ गाळ्यांना टाळे ठोकले. गुरुवारी‎ (ता. ३) सकाळी करनिरीक्षक‎ संजय उमाप यांच्या नेतृत्वाखाली‎ पथकाने ही कारवाई केली.‎ मालमत्ताधारक निवृत्ती मारुती रासने‎ भोग. रोशनशेठ (रा. रासने नगर)‎ यांंच्याकडील १ लाख १७ हजार‎ ७३४ रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचा‎ गाळा ‘सील’ करण्यात आला.

‎ तसेच मालमत्ताधारक विजय मोहन‎ मगर (रा. स्वामी रेसिडेन्सी, समर्थ‎ शाळेपाठीमागे) यांच्याकडे‎ असलेल्या ४७ हजार ४४१ रुपयांच्या‎ थकबाकीपोटी त्यांचा गाळा ‘सील’‎ करण्यात आला. करनिरीक्षक‎ उमाप, संजय तायडे, राहुल शेंडे,‎ अशोक कन्हेरकर, महादेव आढाव,‎ पाशा शेख, अवधूत देशपांडे, शंकर‎ अवघडे, रफिक देशमुख, भगवान‎ सौदागर यांच्या पथकाने ही कारवाई‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...