आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:चालकाअभावी मनपाचे नवीन जेसीबी धूळखात

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने घनकचरा विभागाच्या शहरातील विविध कामांसाठी नवीन जेसीबी खरेदी केले आहेत. मात्र, वाहन चालकांअभावी लाखो रुपये खर्चूनही ही यंत्रसामुग्री धूळखात पडल्याने कामे ठप्प झाली आहेत. येत्या दोन दिवसात ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास मनपात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पत्रकाद्वारे दिला.

वाहन चालक उपलब्ध होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने निविदा काढून कुशल वाहनचालक खाजगी संस्थेमार्फत भरले. मात्र, सादर ठेकेदाराकडून १ नोव्हेंबर पासून जेसीबी वाहनावर ड्रायव्हर उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. त्यामुळे शहर व उपनगरातील कचरा संकलन, खोदाईची कामे ठप्प झाली आहेत.

येत्या दोन दिवसात मनपाने जेसीबी वाहनांवर ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास प्रभाग दोन मधील नगरसेवकांसह नागरिक आंदोलन करतील, असा इशारा वारे यांनी दिला. दरम्यान, वारे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन करणार असल्याचे सांगताच मनपा प्रशासनाने जेसीबीवर वाहन चालक उपलब्ध करून कामास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...