आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामोफोन रेकॉर्ड:ग्रामोफोनमधून निघालेले संगीत भिडते हृदयाला...; 17 प्रकारचे ग्रामोफोन

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत हा मनुष्याच्या आयुष्यातील अिवभाज्य घटक. आधुनिक काळात काही गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. हल्लीच्या काळात सुमधुर गीतांचा खजिना काही मिनिटांत उघडला जातो. मात्र, पूर्वीच्या काळी गाणी रेकोर्डिंग करण्यापासून ते ऐकण्यापर्यंत मेहनत घ्यावी लागत होती. पूर्वीच्या काळात गाणं ऐकण्यासाठी ग्रामोफोनचा वापर केला जात होता. अशाच हिंदी, मराठी गाण्यांचे ग्रामोफोन रेकॉर्ड जमवण्याचा अनोखा छंद केडगावात राहणारे बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उपकार्यकारी अिभयंता एस. आर. गुंजाळ यांनी जोपासला आहे. ग्रामोफोनमधून निघालेले संगीत भिडते हृदयाला...,असे ते म्हणतात.

गुंजाळ यांच्याकडे १९३४ या वर्षांतील ग्रामोफोन आहे, तो आजही सुस्थितीत आहे. तसेच १९४० आिण १९६१ मधील ग्रामोफोनही त्यांच्याकडे आहेत. गुंजाळ यांच्याकडे अडीच हजार ग्रामोफोन रेकॉर्ड आहेत. त्यात इपी, एलपी, ७८ आरपीएम रेकॉर्ड, स्कूल टेप रेकॉर्डर, स्कूल (रिल टू रिल) यांचा संग्रह आहे. अनेक दिग्गज मंडळीनी त्यांच्या ग्रामोफोन संग्रहाला भेट दिली आहे. गुंजाळ यांनी गेल्या ४५ वर्षांपासून रेकॉर्ड जमवण्यास सुरूवात केली. लहानपणापासूनच गाण्याची आवड असल्याने ग्रामोफोनचे गारूड त्याकाळीच मनावर चढले आणि ते ग्रामोफोनच्या प्रेमात पडले. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणाहून १७ ग्रामोफोन जमवले. त्यापैकी ३ मेकॅनिकल ग्रामोफोन, ४ इलेक्ट्रीक ग्रामोफोन, २ यूएसबी ग्रामोफोन त्यांच्या संग्रही आहेत. ते सर्व सुरू आहेत. अडीच हचार हजार गाण्यांचे रेकॉर्ड्स जमवल्याचे सांगितले. गुंजाळ यांना संगीत ऐकण्यासोबतच बासरीवादन, छोटे विमान तयार करणे, ढोलकी वाजवणे, इलेक्ट्रीक प्रोजेक्ट तयार करणे हे छंदही आहेत.

ग्रामोफोनवर गाणी ऐकणं ही दुर्मिळ पर्वणी माझ्या लहानपणी ग्रामोफोन हे करमणुकीचे साधन होते. चावी मारली की गाणे वाजायचे. त्याला वीज नाही, बॅटरी नाही, याचे कुतुहल होते. त्यामुळे जुन्या काळातील सदाबहार गाणी ऐकणं हा छंद मला जडला. मी ग्रामोफोन अधूनमधून लावतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. आजच्या सीडीच्या युगातही जुन्या पण उत्तम अवस्थेतील ग्रामोफोनवर गाणी ऐकणं ही एक दुर्मिळ पर्वणी आहे, असे गुंजाळ सांगतात.

‘भुईकोट’चे मनोगत... गुंजाळ यांच्या संग्रहात इपी, एलपी, ७८ आरपीएम रेकॉर्ड, स्कूल टेप रेकॉर्डर (रिल टू रिल), प्लायवूड, प्लास्टीक रेकॉर्ड, अहमदनगर किल्याचे मनोगत असलेली रेकॉर्ड आहे. या शिवाय ३ मेकॅनिकल ग्रामोफोन, ४ इलेक्ट्रीक ग्रामोफोन, २ यूएसबी ग्रामोफोन आहेत.

मेकॅनिकल ग्रामोफोनला ना वीज लागते ना बॅटरी मेकॅनिकल ग्रामोफोनला ना वीज लागते ना बॅटरी वा सेल. तो चालतो फक्तस्प्रिंगवर असलेल्या एकूण सहा ग्रामोफोन पिन्सवर.या पिन्स मिळत नाहीत. या ग्रामोफोनमध्ये बिघाड झाल्यास ते स्वतः दुरूस्त करतात. या ग्रामोफोनचे इलेक्ट्रॉनिक पार्ट दुर्मिळ आहे. ते बाजारात मिळत नाहीत, ग्रामोफोनसाठी आवश्यक असणारी पीन घासून गुंजाळ त्यांना धार लावतात. त्यांचा उपयोग ते ग्रामोफोन सुरू करण्यासाठी करतात.

बातम्या आणखी आहेत...