आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा:टाळ मृदंगाच्या गजरात नागेश्वर पालखी सोहळा उत्साहात

जामखेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाळ मृदंगाच्या गजरात जामखेड शहरात मंगळवारी श्रीनागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे हरिनाम सप्ताहाचे व श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वरची नागपंचमीच्या निमित्त यात्रा असते. गेल्या १९ वर्षापासून यानिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. सकाळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पूजा झाली.आरती करून श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला. ही पालखी रथात ठेवण्यात आली. हर हर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ मृदंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी मधुकर राळेभात दत्ता वारे, हरिभाऊ आजबे, विकास राळेभात, मंगेश आजबे, रमेश आजबे, सूर्यकांत मोरे, अमोल गिरमे, अमोल लोकरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...