आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांचे श्रध्दास्थान:अहमदनगर शहराचे नाव बदलून आनंदनगर करावे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर हे जैन धर्मियांचे पवित्र असे स्थान आहे. राष्ट्रीय संत आचार्य आनंदऋषिजी हे विविध समाजातील नागरिकांचे श्रध्दास्थान आहे. गेल्या १५-२० वर्षापासून या शहराला आनंदनगर नाव द्यावे, अशी मागणी सुरू आहे. नगर शहराचे नाव आनंदनगर करावे, अशा मागणीचे निवेदन मनपा महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती मीना चोपडा यांनी जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी ऑल इंडिया जैन राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक बाबूशेठ बोरा, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र गांधी, अशोक नहाटा, अनिल धुगड, अजय गुगळे,प्रवीण शिंगवी, प्रीतम पोखरणा,राजेश चेंगडीया, किशोर मुनोत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...