आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा:दिशादर्शक फलकांवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर नाव टाकावे

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिशादर्शक फलकांवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर नाव टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प संचालकांकडे केली आहे. नाव न बदलल्यास अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर केलेले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेऊन अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण केली.

शासकीय कामकाजात व कागदपत्रांवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर नाव वापरण्यासही सुरुवात झाली आहे. नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या जवळ दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्यावर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर नाव टाकले जाणे अपेक्षित होते. औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर असे नामांतर झाल्याचे अवघ्या देशाला माहिती आहे.

असे असतानाही ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक औरंगाबाद उल्लेख करण्यात आला आहे का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी ठेकेदाराच्या कामाकडे लक्ष देत नाहीत का? असे सवाल करत यासंदर्भात तात्काळ दखल घ्यावी व दिशादर्शक फलकांवर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर नाव टाकण्यात यावे. नगर जिल्ह्यात जे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहेत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ज्यांची कामे सुरू आहेत, अशा रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावताना संभाजीनगर असाच उल्लेख करावा. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...