आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जगाच्या उद्धारासाठी बुद्ध धम्माची गरज; भंते सुमंगल माहथेरा यांचे प्रतिपादन

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या उद्धारासाठी बुद्ध धम्माची गरज आहे. देशात शांती, वैभव नांदण्यासाठी श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून माणूस घडवण्याचे कार्य सुरू आहे, असे भंते सुमंगल माहथेरा यांनी सांगितले.

शहरातील टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अखिल भारतीय भिक्षू संघ व तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या वतीने श्रामणेर विधीकर्ता शिबिराचे उद्घाटन भंते सुमंगल माहथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भंते महामोग्गलयान, भंते पट्टेशन, भंते आनंद, लाहन श्रामणेर, आंबेडकर चळवळीचे वसंतराव गवारे, रिपाइंचे संपर्क प्रमुख रोहित आव्हाड, तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, प्रवीण साळवे, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, सचिव सत्यंेद्र तेलतुंबडे, उपाध्यक्ष दीपक अमृत, शिवाजी भोसले, आण्णासाहेब गायकवाड, किशोर कांबळे, प्रकाश कांबळे, मिलिंद आंग्रे, प्रकाश कांबळे, नितीन साळवे, रंगनाथ माळवे, विशाल कांबळे, सिंध्दात कांबळे आदी उपस्थित होते. भंते सुमंगल माहथेरा यांनी मार्गदर्शन केले. भंते सचितबोधी यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांना संस्काराचे धडे दिले जाणार असल्याचे सांगितले. तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी बुध्द धम्माविषयी आपले विचार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...