आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधकाधकीच्या आजच्या जीवनात निरामय आरोग्य व मानसिक व्यवस्थापनासाठी योग व खेळ अत्यंत आवश्यक आहेत. शारीरिक शिक्षणामुळे नेतृत्वगुणांचा विकास होतो. त्यामुळे महिलांनी योग व खेळाचा अवलंब दैनंदिन जीवनात केला पाहिजे, तसेच क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी केले. अहमदनगर महाविद्यालयात सुरू असणाऱ्या नारीशक्ती सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी फुगे आकाशात सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
या वेळी कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. रझ्झाक सय्यद, डॉ. नोएल पारगे, डॉ. प्रीतम बेदरकर, रजिस्ट्रार दीपक आल्हाट, महाविद्यालातील वुमेन्स् सेलच्या संचालिका प्रा. रुपाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्राचार्य बार्नबस म्हणाले, “क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पूर्वीच्या काळात खेळाडू, प्रशिक्षक, संघटक एवढ्यापुरतेच विश्व होते, परंतु आता विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांनी साठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून एक हक्काचे व्यासपीठ त्यांना तयार करून देण्यात येत आहे.” कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजीत जगताप यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. नजम्मुसेहेर सय्यद व प्रा. पौर्णिमा बेहेरे यांनी परिश्रम घेतले. क्रीडा स्पर्धामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. सहभागी विद्यार्थिनींनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.