आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:पुढील पिढीच्या भवितव्यासाठी झाडे लावून ती जगवण्याची गरज : तांबे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशामध्ये अतिवृष्टी होत आहे, तर अमेरिका व युरोपमध्ये दुष्काळ पडलेला आहे. तसेच जगामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते, अशा प्रसंगाने इशारा दिला आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर जगाला चिंता पडली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले, मात्र मनुष्याने निसर्गाची मोठी हानी केली आहे. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

मुकुंदनगर येथील सीआयव्ही सोसायटी मैदानावर वृक्षारोपणचा कार्यक्रम कर्मयोगी प्रतिष्ठान व आसिफ सुलतान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करून वृक्षारोपण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. तांबे व मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, अब्दुस सलाम, सिराज इनामदार, नगरसेवक समद खान, माजी आरटीओ सय्यद शहा निजाम, हाजी मन्सूर शेख, हरर्जितसिंग वधवा, मेहराज इनामदार, डॉ.एम के. शेख, आरिफ सय्यद, अफजल सय्यद, आयटीआय प्राचार्य खालीद जहागीरदार, नगरसेवक असिफ सुलतान, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागीरदार, प्राचार्य डॉ.रिजवान अहेमद, नफीस चुडीवाला, अजीम सय्यद, जावेद शेख, अश्फाक हुसेन अहमद, अॅड. फारुख बिलाल, हाजी सादिक तांबोली, मुबिन शेख, इंजिनीयर अनिस शेख, समीर खान, डॉ. इमरान शेख, इरफान जागीरदार, अन्वर सय्यद, अन्सार शेख, फरीद जहागीरदार, अनवर शेख आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, कर्मयोगी प्रतिष्ठान व आसिफ सुलतान मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेला कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे. वृक्षारोपणासाठी जे काही मदत लागेल मनपाच्या वतीने देखील पुढाकार घेऊन वृक्षारोपण मोहीम चालू ठेवण्यासाठी सहकार्य करू, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...