आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी अद्ययावत इमारतीचे बांधकाम वर्षभरापासून पुर्णत्वास गेले अाहे. ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत लोकार्पणसाठी खोळंबलेली अाहे. या इमारतीच्या खिडक्यांच्या काचेच्या तावदानास दुर्लक्षा अभावी तडे गेले आहेत.
कुकाणे प्राथमिक केंद्रातर्गत भेंडे खुर्द व भेंडे बुद्रूक या मोठ्या गावांसह १८ गावे व त्याखालील ५४ हजार ४५८ लोकसंख्या येते. भेंडे खुर्द व भेंडे बुद्रूक, देवगाव, देडगाव, तरवडी व तेलकुडगाव येथे आरोग्य उपकेंद्रे आहेत. कुकाणे केंद्रासाठी नवी अद्ययावत इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटत आले. पण ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. नव्या बांधकामाच्या खिडक्यांच्या काचांनाही तडे गेले आहेत. कुकाणे, भेंडे व वरील गावांसह चिलेखनवाडी, अंतरवाली, साैंदाळे, सुकळी, शिकारी नांदूर, वडुले, देवसडे, जेऊर हैबती आदी गावांचा समावेश कुकाणे केंद्रातर्गत आहे. गेल्या चार वर्षांपासून बांधकामामुळे कुकाणे केंद्र तात्पुरते कुकाणेतील पाटबंधारे वसाहतीतील जुन्या खाेल्यांत स्थलांतरित करण्यात केले अाहे.
कुकाणे आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्रक्रिया,प्रसुतीसह केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. नव्या इमारतीमुळे वाॅर्डही प्रशस्त झाले अाहे. रुग्णसंख्या वाढणार आहे, असे कुकाण्याचे अाराेग्याधिकारी रामेश्वर शिंदे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.