आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयकल्लोळ!:नगरमध्ये बळींची संख्या 102, 88 की 39? तिन्ही यंत्रणांचे परस्परविरोधी आकडे, नगरकरांची होरपळ कायम

नगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरमध्ये रविवारी बळींची संख्या एकदम १०२ वर गेल्याने खळबळ उडाली. आठवड्याची सरासरी ३९-४० असताना अचानक वाढलेल्या मृतांच्या आकड्याने सर्वांचीच झोप उडवली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना कोरोना पोर्टल अपडेट झाले नसल्याने हा घोळ झाल्याचे कळवले. प्रत्यक्षात नगर जिल्ह्यात रविवारी ३९ मृत्यू आहेत. एप्रिलमध्ये पोर्टलवर आकडेवारी व्यवस्थित अपलोड होत नव्हती. रविवारी अपडेट केल्यानंतर अचानक आकडेवारी १०२ वर गेल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे म्हणणे आहे. तरीही जनतेच्या मनात एक प्रश्न कायम राहिलाच... एक यंत्रणा आकडा सांगते १०२, राज्य सरकारची आकडेवारी सांगते ८८ आणि स्थानिक प्रशासन सांगते ३९, मग खरे मृत्यू झाले तरी किती?

मराठवाड्यात ७७३७ पॉझिटिव्ह, १३७ मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात रविवारी ७७३७ पॉझिटिव्ह रुग्ण. १३७ मृत्यू. दिवसभरात ५९१२ जण बरे झाले. ७० हजार ७१५ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी आढळलेले रुग्ण -कंसात मृतांची संख्या : औरंगाबाद १४२९ (२२), जालना ९०९ (७), परभणी ४८९ (८), हिंगोली १८८ (७), नांदेड १२८७ (२७), लातूर १८१३ (५०), बीड ११४५ (००), उस्मानाबाद ४७७ (१६).

विदर्भात चोवीस तासांत २०७ बळी
विदर्भात चोवीस तासांत २०७ मृत्यू झाले, तर १६०८७ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १५१ जणांमध्ये नागपूर ८५, भंडारा २६, चंद्रपूर २५, गोंदिया १०, वर्धा ५ तर गडचिरोलीच्या एकाचा समावेश आहे. प. विदर्भात ५६ जणांचा मृत्यू झाला. यात अमरावतीत सर्वाधिक २२, यवतमाळ १७, वाशीम व बुलडाण्यात प्रत्येकी ६, अकाेला जिल्ह्यातील ५ जणांचा समावेश.

बातम्या आणखी आहेत...