आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:कृषी विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पाचा देशात प्रथम क्रमांक; उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सन्मान

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी कृषी विद्यापीठातील बिजोत्पादन प्रकल्पाला देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल माऊ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या ३७ व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत सन्मानित करण्यात आले.

या बैठकीसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहायक निदेशक डॉ. डी. के. यादव, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार व भारत सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव अश्विन कुमार उपस्थित होते.

संपूर्ण देशभरात ६५ गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. कृषी विद्यापीठातील बिजोत्पादन प्रकल्पाद्वारे तयार होणारे फुले बियाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या व बिजोत्पादन कंपन्यांच्या पसंतीस उतरले. कांदा फुले समर्थ बियाण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते.

याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन पिकाचे फुले संगम व फुले किमया या वाणांच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची पसंती आहे. विद्यापीठांमध्ये २७ पिकांच्या वाणांचे मूलभूत व पायाभूत बिजोत्पादन करून सदर बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नॅशनल सीड कार्पोरेशन व बियाणे उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी गट यांना उपलब्ध करून दिले जाते. दरवर्षी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तसेच महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे मूलभूत व पायाभूत बियाणे तयार करून त्यांचा पुरवठा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...