आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:वसंत टेकडी येथील जुनी टाकी कार्यान्वित होणार

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला वसंत टेकडी येथील जुन्या ६८ लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. ही टाकी जुनी असल्यामुळे तिला गळती सुरू झाली होती. त्याच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. संपूर्ण नगर शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, असल्याचे व फेज टू योजनेमधील टाक्या कार्यान्वित होणार अाहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी महापौर शेंडगे यांनी केली. यावेळी महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक श्याम नळकांडे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे, अभियंता गणेश गाडळकर, कार्यकारी अभियंता अजय मुळे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी जय बिवाल, शाखा अभियंता सतीश बडे, जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. अमृत पाणी योजनेचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.

काम पूर्ण झाल्यावर लवकरच हे पाणी वसंत टेकडी येथे जुन्या टाकीमध्ये पडणार आहे. त्यामुळे सुमारे ११० लाख लिटर पाणी नगरकरांना प्रतिदिन मिळणार आहे. नगर शहराचा अनेक वर्षाचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, असे महापौर शेंडगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...