आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:समाजाचे संघटन हे प्रत्येक घटकांना दिशा देणारे

राहुरी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाचे संघटन हे प्रत्येक घटकांना दिशा देणारे ठरत असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अरूण तनपुरे यांनी केले.राहुरीतील तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.

भागवत लुटे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी,रविंद्र करपे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी,लहानु नागले यांची जिल्हाध्यक्षपदी, चंद्रकांत शेजुळ यांची नगर जिल्हा निरीक्षकपदी,सोमनाथ देवकर यांची नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरूण तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव शेजुळ,अशोक शेजुळ,अरविंद दारूणकर,दत्तात्रय सोनवणे, संदीप सोनवणे,विजय काळे,संतोष मेहेत्रे,मनोहर सुद्रिक, सुरेश धोत्रे, नितीन फल्ले, पोपट ङोळसे, योगेश पतके उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश शेजूळ यांनी, तर आभार कैलास शेजुळ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...