आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:सहकारी संस्था कशा चालतात हे संस्थेने दाखवून दिले; ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा कणा : गडाख

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारी संस्था कशा चालवाव्यात हे छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेने दाखवले आहे. कारण ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. ते गावातील विकास कामे चांगल्या पध्दतीने राबवत असतात, असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी केले.

येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेला माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सुदाम बनसोडे, संचालक जगदाळे, संचालक अशोक जगदाळे, संतोष खंडागळे, ज्ञानदेव शिंदे, अरविंद शेळके, दादासाहेब डोंगे, संतोष साबळे, रावसाहेब डौले, प्रा. देविदास साळुंके आदी उपस्थित होते. गडाख म्हणाल्या, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था जुनी आहे. या संस्थेचे आज कल्पवृक्षात रुपांतर झालेले आहे. सहकाराचा जिल्हा असून सहकारी संस्था कशा चालतात हे या संस्थेने दाखवून दिलेले आहे. संस्थेला भेट देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार पुस्तके भेट देऊन केला जात आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. बनसोडे यांच्या कार्यकाळात संस्थेने चांगलीच प्रगती केली अशीच प्रगती कायम होत रहावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रास्ताविक चेअरमन सुदाम बनसोडे यांनी संस्थेची माहिती देऊन वाढलेल्या आलेखाची माहिती विशद केली. सूत्रसंचालन अशोक जगदाळे यांनी, तर आभार संचालक जयराम ठुबे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...