आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश‎:"नगर अर्बन''च्या संचालकांच्या‎ पासपोर्टची माहिती मागवली‎

नगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन बँकेच्या २०१४ ते २०१९‎ या काळातील संचालकांनी व‎ संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी‎ त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत‎ आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा‎ करण्याचे आदेश देण्यात आले‎ आहेत. तसेच या संचालक व‎ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या पूर्व‎ परवानगीशिवाय नगर सोडू नये,‎ असेही निर्देश देण्यात आल्याची‎ माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे‎ उपअधीक्षक कमलाकर जाधव‎ यांनी दिली.

बँकेतील २८ कर्ज‎ प्रकरणांत सुमारे १५० कोटींचा‎ गैरव्यवहार झाल्याची फिर्याद माजी‎ संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेली‎ आहे. या तपासाच्या अनुषंगाने‎ पोलिसांनी दिल्याने आदेशामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎ बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली‎ आहे.‎ गैरव्यवहाराच्या तक्रारीचा तपास‎ करताना त्या पाच वर्षांच्या‎ काळातील सर्वच कर्जप्रकरणांचे‎ फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे.‎ त्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल‎ न्यायालयास सादर झाल्यावर व‎ त्यात गंभीर निरीक्षणे असल्याने‎ संबंधित पाच वर्षांच्या काळातील‎ संचालक व अधिकारी फरार‎ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎

मालमत्तांची विल्हेवाटही‎ लावण्याची शक्यता असल्याने‎ त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे,‎ अशी मागणी फिर्यादी गांधी यांनी‎ अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे‎ केली आहे. या पार्श्‍वभूमीवर,‎ आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने‎ संबंधित संचालकांनी त्यांच्या‎ पासपोर्टची साक्षांकित प्रत जमा‎ करावी. तसेच पोलिसांच्या‎ परवानगीशिवाय नगर सोडू नये,‎ असे आदेश दिले आहेत.‎

बँकेच्या पाच शाखा बंद होणार?‎
नगर अर्बन बँकेच्या पाच शाखा लवकरच बंद होण्याची चिन्हे असल्याचा‎ दावा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केला आहे. बँक मल्टिस्टेट होण्यापूर्वी‎ बँकेच्या ४७ शाखा होत्या. प्रशासक कालावधीत सहा शाखा बंद झाल्या व‎ आता आणखी पाच बंद होणार असल्याने बँकेच्या ३६ शाखा आता‎ राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...