आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक गणेशत्सव:देवळाली प्रवरामध्ये शांतता समितीची बैठक ठरली फार्स

देवळाली प्रवरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा पोलिस दुरक्षेत्रावर घेण्यात आलेली सार्वजनिक गणेशत्सव शांतता कमिटीची बैठक केवळ फार्स म्हणून घेण्यात आली की काय असा प्रश्न विचारला जात आहे. पन्नास हजार लोकसंख्येच्या गावात अवघे बारा जण शांतता बैठकीला उपस्थित होते. देवळाली प्रवरा शहरातील मोठे मंडळ, राजकीय व्यक्ती, प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी मंडळ यांना शांतता बैठकीपासून दूरच ठेवले. अनेक सार्वजनिक गणेशत्सव मंडळांना शांतता बैठकीची कल्पनाही नाही. त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जादा गर्दी करू नका असे फर्मान असल्यानेच पोलिसांनी बैठकीचे निमंत्रण दिले नाही का? असा प्रश्न पदाधिकारी करीत आहे.

देवळाली प्रवरा दुरक्षेत्रावर सार्वजनिक गणेशत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती. राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शांतता बैठक ही कामात काम म्हणून उरकण्यात आली.शांतता बैठकीचे पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, महावितरण अधिकाऱ्यांला निमंत्रण नव्हते. माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, प्रकाश संसारे, माजी नगरसेवक डॉ. विश्वास पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज, मोहसीन शेख, सुधीर टिक्कल, संदीप कदम यांच्यासह अनेकांना बैठकीचे निमंत्रण नव्हते.

बातम्या आणखी आहेत...