आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:कुकाणे ते शेवगाव खड्डेमय रस्ता ठरतोय वाहनांना अडसर; रात्रीच्या पावसाने तर जागोजागी डबक्यांची साखळीच

कुकाणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे ते शेवगाव मार्ग चिलेखनवाडी शिवारात नेवासे हद्दीपर्यंत पूर्णपणे उखडलेला आहे. गुरुवारी रात्रीच्या पावसाने तर जागोजागी या मार्गावर डबक्यांची साखळीच तयार झालेली आहे. खड्ड्यातील पाण्यातून मार्ग काढत वाहनांचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकपणामुळे प्रवासी व नागरिकांचे हाल सुरुच आहेत.

कुकाणे ते चिलेखनवाडी व पुढे भायगावपर्यंत नेवासे तालुक्याची हद्द आहे. कुकाणे ते भायगाव हा मार्गच अस्तित्वहिन झालेला आहे. रस्त्यांवरचे खड्डे अपघातास कारणीभुत ठरत आहेत गेल्या पंधरा दिवसांपुर्वीच चिलेखनवाडीत खड्ड्यात दुचाकीवरुन पडून एक महिला जागीच ठार झाली होती. चिलेखनवाडी ते कुकाणे हे अंतर अवघे तीन किमीचे पण पंधरा मिनिटातही ते पार करता येत नाही कुकाणे बस थांब्यापासून ते चिलेखनवाडीपर्यंत रस्त्यावर डांबराचा थर निघून खड्डे पडलेले आहेत. पुढेजी सावंत, दुकळे वस्तीपर्यंत रस्ता खचून गटारे झाली आहेत. हा मार्ग नेवासे शेवगाव मार्ग आहे.

महत्त्वाच्या मार्गाची ही मोठी दुरावस्था आहे. अशीच परिस्थिती कुकाणे ते घोडगाव मार्गावर कोठा गावापर्यंत झाली आहे. कुकाण्यापासुन देवगाव व पुढे शहापुर फाटा, फत्तेपूर व कौठा हा रस्ता खड्डेमय आहे. कुकाणे परिसराला हा मार्ग नगरचा आहे. पण दुरावस्थेमुळे कुकाणे ते नेवासेफाटा मार्गे नगरला जावे लागते २० किमीचा अधिक प्रवास त्यासाठी करावा लागतो. हा भूर्दंड सार्वजनिक बांधकाम खात्यामुळे प्रवाशांना सोसण्याची वेळ आली आहे. कुकाणे ते दहिगाव रस्ताही खड्डेमय झाला आहे. कुकाणे परिसरातील रस्ते आता मृत्युचे सापळे बनले आहेत. चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत व बजरंग पुरी यांनी रस्ता दुरावस्थेच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...