आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:मध्य शहरातील रस्त्यांवर खड्डे कायम राहणार, वाढीव दराच्या निविदांमुळे निधीचे त्रांगडे कायम

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने दिलेल्या १० कोटी रुपयांच्या विशेष निधीमधील मंजूर रस्त्यांच्या कामांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव दराने मंजूर केलेल्या निविदांमुळे या कामांसाठी अतिरिक्त निधीचा प्रश्न उभा निर्माण झाला आहे. यातून मार्ग न निघाल्यास मध्यवर्ती शहरातील रस्त्यांवर खड्डे कायम राहण्याची चिन्हे आहेत.

तत्कालीन युती सरकारच्या काळात नगर शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. यातून ४७ रस्त्यांची कामे मंजूर आहेत. या कामांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव दराने मंजूर केल्यामुळे अतिरिक्त २.३४ कोटी रुपयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दरम्यानच्या काळात बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे जुन्या दराने काम करण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शवली आहे. या दरवाढीमुळे अतिरिक्त २.३७ कोटी रुपये निधीची गरज पडणार आहे. सदरचे सुमारे पावणे पाच कोटी रुपये महापालिकेने द्यावेत, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेला आहे. मात्र, याला नगरसेवकांकडून विरोध सुरू झाला असून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे महापालिकेकडून निधी दिला जाण्याची शक्यता कमीच आहे.

बातम्या आणखी आहेत...