आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव घसरला:बाजरीचा भाव घसरला; सोयाबीनचे दर मात्र स्थिर

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस थांबल्यानंतर जिल्हाभरात खरिपाची पिके सोंगणीच्या कामाला गती आली आहे. बाजार समिती बाजरीसह सोयाबीनची आवक सुरू आहे. ३ दिवसांपूर्वी बाजरीला दोन हजार पर्यंतचा भाव मिळाला होता. आता हा भाव घसरून अवघा एक हजार सातशे रुपयांवर पोहोचला आहे. अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान झाले असताना घसरलेला बाजार भाव शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे.

२ नोव्हेंबरला वांबोरी उप बाजारात बाजरीला प्रतिक्विंटल १७०१ ते २००० रुपयांचा दर मिळाला होता तर सोयाबीनला चार हजार ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला होता. याच उप बाजारात शनिवारी भुसार मालाचा लिलाव झाला. त्यात बाजरीला प्रतिक्विंटल अवघा १४०० ते १७१३ रुपयांचा भाव मिळाला.

अवघ्या चारच दिवसात सुमारे तीनशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शेतमालाला अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे पिकांना दरवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच शनिवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल चार हजार पाचशे ते ५ हजार ४८१ रुपयांचा बाजार भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...