आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव:वांबोरीत कांद्याला साडेतीन हजारांचा भाव

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात गुरूवारी १७ हजार ८४२ कांदा गोण्यांची आवक झाली होती. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ७०५ ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदा १ हजार ८०० ते २ हजार ४०० रूपये भाव मिळाला. कांद्याचे दर मागील काही दिवसांत तीन हजारी पार गेले आहेत. या दरात पुढील कालावधीत अधिक वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

दोन नंबर कांदा २००५ ते २ हजार ७०० रूपय तर तीन नंबर कांद्याची ३०० ते २ हजार ४०० रूपये दराने विक्री झाली. उपबाजारात दाखल झालेल्या १७ हजार ८४२ कांदा गोणींपैकी केवळ १८८ गोणी कांद्यालाच ३ हजार ४०५ ते ३ ह जार ५०० चा दर मिळाल. सर्वाधिक ६ हजार २२५ गोणी कांद्याला २ हजार ते २ हजार ५०० चा दर मिळाला.

बातम्या आणखी आहेत...