आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिनाभरापूर्वी २२०० रुपये प्रतिक्विंटलने एक नंबरचा कांदा विकला गेला. या दरात सातत्याने घसरण सुरू असून, सद्यस्थितीत कांद्याला अवघा १ हजार ते १ हजार ३०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. दुसरीकडे तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे गेल्या हंगामात कांद्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बीचा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गावरान कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, मागील काही दिवसांचा आढावा घेतल्यास कांद्याच्या दरात सतत घसरण होताना दिसत आहे. जिल्ह्यात २ जानेवारीला लाल कांदा १७०५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.
वांबोरी उपबाजारात ४ फेब्रुवारी रोजी १० हजार ४४९ गोणी कांद्याची आवक झाली. तेथे एक नंबर कांद्याला १ हजार ते १ हजार ३०० रुपये, दोन नंबर ७०५ ते १ हजार, तर तीन नंबर कांद्याला १०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलची बोली लागली. भुसार मालाच्या मोंढ्यावर २८ जानेवारीला तूर ६ हजार ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली गेली. ३ फेब्रुवारीला तुरीचा भाव तब्बल ६९०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला होता. तुरीच्या दरात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसत आहे. सोयाबिनचे दर ५ हजार ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलवर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. आठवडाभरापूर्वीच्या दराच्या तुलनेत गहू व बाजरीच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसत आहे.
धान्याचे भाव (प्रति क्विंटल)} बाजरी - १८५२ ते २३०१ गहू - २२०० ते २९०१ तूर - ६६४६ ते ६९०० सोयाबिन - ५०२६ ते ५०५० रुपये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.