आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोचिंग क्लासमध्ये भवितव्य दिसते याला जबाबदार कोण?:शाळा, महाविद्यालयामध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे अपयश- मंत्री विखे

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळांची किरकोळ शुल्क पालक देत नाहीत, मात्र कोचिंग क्लासची पन्नास हजार ते लाखभर रुपयांचे शुल्क देण्यास तयार होतात. कारण पालकाला कोचिंग क्लासमध्ये मुलांचे भवितव्य दिसते आहे. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? शाळा महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा असतानाही दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे आपले अपयश आहे असे खडे बोल महसूलमंत्री राधाकृषण विखे यांनी नगर येथे आयोजित मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधीवेशनात सुनावले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 61 वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, माजी आमदार शिवाजी कर्डिले, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, सुनील पंडीत, शिवाजीराव काकडे, प्रा. भानुदास बेरड, दिलीप भालसिंग, बाळासाहेब कळसकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वसंत लोढा आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, उद्याच्या पिढीला घडवून ज्ञानसंपन्न करण्याची जबाबदारी शाळांचे मुख्याध्यापक निभावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35 वर्षांनी नवे शैक्षणिक धोरण देशांत आणले आहे. हे नवे धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. जगाच्या पाठीवर डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारले जात आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आत्मसात करून शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. सोशल मिडीया मुळे अनेक चांगल्या वाईट गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षकांआधी कळत आहेत. या नव्या तंत्रज्ञानात मुख्याध्यापक कोठे आहेत हे पहाणे गरजेचे आहे. विद्यार्थी आता शाळा महाविद्यालयांवर अवलंबून नाहीत.

खाजगी कोचिंग क्लासेसकडे तो वळला आहे. त्यामुळे कोचिंग क्लासेसचे पेव फुटेले आहे. शाळांची किरकोळ फी पालक देत नाहीत मात्र कोचिंग क्लासची पन्नास हजार ते लाख रुपयांची फी देण्यास पालक तयार होतात. कारण पालकाला कोचिंग क्लासमध्ये मुलाचे भवितव्य दिसते आहे. या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ? शाळा महाविद्यालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना का येथे दर्जेदार शिक्षण मिळत नाही. हे आपले अपयश आहे, असे सांगितले.

शिक्षकप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

महासंघाच्या अधिवेशनाच्या व्यासपिठावरून सीईटीच्या फायदे तोट्यावर विचार मंथन होऊन मार्ग काढणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मागण्या व अधिकारासाठी आंदोलने होत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात काहीही गैर नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असेही, राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

विखे शिक्षक प्रश्न सोडवतील - कर्डीले

मुख्याध्यापक अधिवेशनाचे उद्घाटन शिक्षकांच्या प्रश्नांची जान असलेल्या योग्य व्यक्तीद्वारे झाले आहे. मंत्री विखे शिक्षणमंत्री असताना शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. ते शिक्षक व मुख्याध्यपकांचे प्रश्न प्रश्न नक्कीच सोडवतील, असे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...