आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटी कर्मचाऱ्­यांचे प्रश्न:कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार; मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही

शिर्डी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी येथील साईबाबा संस्थानमध्ये कर्मचा­ऱ्यांमध्ये भेदभाव न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुध्दा कायम कर्मचा­ऱ्यांप्रमाणे वेतन व सवलती मिळाव्यात. शिर्डी संस्थान कंत्राटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने शिवसेना जिल्हा संघटक विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्­यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. त्यापैकी संस्थानमध्ये कायम आणि कंत्राटी कर्मचारी असा भेदभाव होत आहे. कंत्राटी कर्मचा­यांना कायम कर्मचा­यांच्या तुलनेत वेतन व सुविधा सवलती मिळत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडण्यासाठी शिर्डी कंत्राटी कामगार संघटनेच्या कामगारांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक काळे यांना भेटून विनंती केली होती. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर कामगारांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचे काळे यांनी ५० कंत्राटी कामगारांचे शिष्टमंडळ मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या भेटीला नेले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कामगारांचे प्रश्न व समस्या समजावून घेत सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाला सुचना दिल्या. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुध्दा याप्रश्नी संस्थान विश्वस्त व प्रशासनाला विशेष लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याचे सुचित केले आहे. संस्थान कंत्राटी कर्मचा­ऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात शिवाजीराजे चौधरी, अॅड. सुभाष जंगले, संजय फंड, कमलाकर शेजवळ, उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, अजय खैरनार, अरुण मंडलिक तसेच रोहित सोनवणे, योगेश आहिरे, गणेश बहिरट, बळीराम सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सोनवणे, हर्षल तरकसे आदी होते.

बातम्या आणखी आहेत...