आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न गंभीर:श्रीगोंदे तालुक्यात अवैध खासगी सावकारकीचा प्रश्न गंभीर

अंकुश शिंदे | श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे शहरात सुरू असलेली अवैध सावकाराच्या जाचामुळे शिवराम वहाडणे या वडा-पाव विक्रेत्याने आत्महत्या केली. त्यामुळे अवैध वसुली करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर या प्रकरणात श्रीगोंदे पोलिसांनी ७ आरोपी गजाआड केले, तर आठ आरोपी फरार आहेत. पोलिस मात्र उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.

श्रीगोंदे तालुक्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट चालू असून आठ दिवसाला व्याजाची अव्वाच्या सव्वा वसुलीने त्रस्त झालेल्या वैफल्यग्रस्त तरुणांनी न्याय मिळण्याची आशा व्यक्त केली. श्रीगोंदे शहरात उद्योग व्यवसाय हे मोठे नसल्याने कुठली औद्योगिक वसाहत नसल्याने सर्वच तरुणाच्या हाताला काही काम मिळत नाही. शहरात अनेक तरुण छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत.

या व्यवसायात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेक वेळा बँक, पतसंस्थाकडे कर्ज घ्यावे लागते, हे कर्ज अनेकांना उपलब्ध होते. मात्र, अनेक जणांना कुठली पत नसल्याने सहज कर्ज उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती असल्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुणापुढे तरी हाथ पसरावे लागतात. शहरात अश्याच प्रकारे व्यवसायिक, कामगार, नोकरदार, शेतकरी, बेरोजगार तरुण यांपैकी अनेकांना आर्थिक गरज पडते. अशावेळी त्यांच्या आर्थिक प्रश्न बँक, पतसंस्थामधून सुटत असली तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच, असे नाही यापुढे जाऊन एेनवेळी कुणी कर्ज देते असे ही नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खासगी सावकारांच्या दारात जावे लागत असल्याने शहरात असे कर्ज देणारे अनेक जण आहेत. यांच्याकडे कुठले परवाना नाही. मात्र एेनवेळी कुणाच्या तरी मध्यस्थीने पैसे दिले जात असले तरी एक महिन्यासाठी शेकडा पंधरा ते चाळीस टक्के प्रमाणे हे सावकार पैसे देत आहेत. हे कर्जापेक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक तरुण या ओझ्याखाली दबले आहेत.

आत्म्हत्या करणारे शिवराम वाहडणे यांच्या डायरीमध्ये सुमारे ३० जणांची नावे असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस स्टेशनमध्ये १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रीगोंदे बसस्थानक परिसरातील तरुणांनी सांगितले की, या परिसरात आठ ते दहा असे बेकायदेशीर सावकार असून ते गरजवंताला अश्या प्रकारे पैसे देतात. मात्र आठ दिवसांला चाळीस टक्केप्रमाणे पैसे वसुली करतात. वेळप्रसंगी दहशत करत आहेत.

श्रीगोंदे तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात खासगी सावकारांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे खासगी सावकार वसुलीसाठी पिळवणूक करत आहेत. एव्हढेच नव्हे, तर शेतजमीन लिहून घेतल्या आहेत. अशा सावकारांवर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले कारवाई करणार का, असा सवाल श्रीगागेंदे तालुक्यातील नागरिक करत आहे.

... तर पाच वर्षांपर्यंत शिक्षा
अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा राज्यभर लागू केला. या कायद्यानुसार अवैध सावकारी करणाऱ्यास पाच वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद केली. मात्र, श्रीगोंदे येथील दुय्यम निबंधक अधिकारी यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

बातम्या आणखी आहेत...