आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहाता तालुक्यातील अकरा गावांचा समावेश २००९ मध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आला. या ११ गावांतील मतदारांनी अशोकराव काळे यांना मताधिक्य दिल्यामुळे ते पुन्हा आमदार झाले. या ऋणातून उतराई होण्यासाठी विकास निधीच्या बाबतीत कोपरगाव तालुक्याप्रमाणे या अकरा गावांनाही समसमान निधी देऊन त्यांनी विकास प्रश्न मार्गी लावले. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मागील साडे तीन वर्षात अकरा गावातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला अाहे. या पुढील काळात देखील नागरिकांच्या मागणीनुसार उर्वरित सर्वच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथे २० लाख रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या राहाता चितळी रोड, ग्रा.मा. ६३ ते शिवाजीराव साबदे घर रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन आणि २० लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या कानिफनाथ अमोलिक घर ते जयवंत वैराळ घर रस्ता डांबरीकरण करणे, पोपटराव चोथमल घर ते ज्ञानदेव वैराळ घर रस्ता डांबरीकरण करणे व ग्रामपंचायत अंतर्गत ११ लक्ष ४० हजार रुपये निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षापासून कालवे व वितरिका दुरुस्तीची कामे झालेली नव्हती. त्यामुळे आवर्तन काळात अडचणी येवून त्याचा परिणाम आवर्तनावर होत होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडून कालवे दुरुस्तीसाठी ३०० कोटी निधीला मंजुरी मिळवली अाहे. दरवर्षी १०० कोटी रुपये निधीतून कालव्यांची दुरुस्ती होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.