आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात बाप्पाला निरोप:ग्रामदैवत असलेल्या मानाच्या श्री विशाल गणेश मंडळाच्या गपपतीचे विसर्जन मिरवणूक

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुक सुरू झाली. या निवडणुकीत पारंपारिक वाद्य असलेल्या ढोल- ताशे, लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान माळीवाडा मार्गे मध्य शहरातील विविध भागातून जाऊन दिल्ली गेट मार्गे सायंकाळी श्री गणेशाचे विसर्जन होणार आहे.

सकाळी अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते श्री विशाल गणेश मंदिरात मानाच्या पहिल्या श्री विशाल गणेश मंडळाच्या गणपतीची महाआरती झाली. यावेळी श्री विशाल गणेश ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरती नंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. यंदा प्रथमच श्री विशाल गणेश ट्रस्ट मंडळाने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना शारीरिक इजा होऊ नये म्हणून प्रथाला ट्रॅक्टर जोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या मिरवणुकीत रथाला ट्रॅक्टर लावण्यात आला होता. महाआरतीनंतर जागोजागी श्री विशाल गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. शिस्तबद्ध व नियोजनबद्ध म्हणून ख्याती असलेल्या या श्री विशाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. सर्वच पथकांना या मिरवणुकीत सहभागी करून घेण्यात आले होते.

मिरवणुकीत 16 गणेश मंडळांचा सहभाग

श्री विशाल गणपती मंडळासह अन्य 11 मानाची गणेश मंडळे व इतर काही अशी 16 गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मानाच्या पहिल्या श्री विशाल गणपती मंडळाची मिरवणूक माळीवाडा वसंत टॉकीज, हातमपुरा, परसराम कुंड, डाळमंडई, कापड बाजार, अर्बन बँक, शहर सहकारी बँक, नेता सुभाष चौक, चितळे रोड, सावरकर पुतळा मार्गे दिल्लीगेटला सायंकाळी सहा वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...