आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कर्जत-जामखेडमध्ये 2024 ला कार्यक्रमच करणार

जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपला भाग, आपला परिसर, आपल्या लोकांच्या समस्या मला कळतील, तसे दुसऱ्याला कसे कळेल? लोकांच्या अडचणी सोडवत आलो, म्हणून एवढे प्रेम व आपुलकी मिळतेय. २०२०-२१ वाईटच गेले, २०२२ शेवटी भारी गेले, आता २०२३ मध्ये नेहमीप्रमाणे लोकांच्या अडीअडचणी सोडवत विकासाचे काम करणार नि २०२४ ला कार्यक्रमच करणार असल्याचा इशारा आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता दिला.

डॉ. ज्ञानेश्वर झेंडे मित्रमंडळाच्या वतीने व वीट उत्पादक संस्थेच्या वतीने आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वीटभट्टीवरील कामगार महिलांना साडीवाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष अजिनाथ हजारे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, शहाजी राऊत, गणेश मेंडकर, सतीश पालकर, अशोक निमोणकर, ज्ञानेश्वर जमदाडे, पप्पू बोराटे, अजिनाथ निमोणकर, विजू गदादे, डॉ. अल्ताब शेख, प्रवीण चोरडिया, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. अनभुले, सलीमभाई बागवान, सलीमभाई तांबोळी, अविनाश बोराटे, नितीन धनवटे, सुरेश पठारे, अभय औटी, लाभेश औटी, नितीन धनवटे, वैशाली झेंडे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “जामखेड नळपाणीपुरवठा योजनेसाठी २५० कोटींचा निधी आणला, परंतु सत्ता असताना ज्यांना काही करता आले नाही, ते आता मोठमोठ्या वल्गना करीत आहेत. आता जनता ‘यांच्या’ भूलथापांना बळी पडणार नाही. लोकांना खेळ पैठणीचा, चॉकलेट, चष्मा, नोकरी सारखी आमिषे दाखवून फसविले. त्यामुळे जनता त्यांना चांगलीच ओळखून आहे. ‘बारामती ॲग्रो’च्या चौकशीप्रकरणी, तसेच अनधिकृत खाण व स्टोन क्रशरप्रकरणी अधिकारी निलंबित केले. आमदार झालो अन् सरकारही आपलं आहे. आता आणखी मोठे डाव खेळणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणार आहे.” सूत्रसंचालन नारायण राऊत यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...