आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:निरक्षरता संपवणे हा तर कायद्याचा उद्देश ; पंडित

कोपरगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निरक्षरता स्वतःला व देशाला बांधक असते. त्यामुळे निरक्षरता संपवणे हा कायद्याचा उद्देेश असून, शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील कायद्याचे पालन करत नाही तसेच कायद्याची माहिती त्यांना नसते माणूस मनाने विकसित होतो. तेव्हा देशात विकास झालेला असतो, असे प्रतिपादन वरिष्ठ अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी केले.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका विधी सेवा समिती व वकील संघ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय जनजागृती अभियान विधी सेवा व विधी साक्षरता पर जनजागृती अभियान आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित बोलत होते. यावेळी वरिष्ठ अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, नामदेवराव पाटील विधी महाविद्यालयाचे संस्थापक हिरालाल महानुभाव, जिल्हा सरकारी वकील अशोक वहाडणे, सहायक सरकारी अभियोक्ता सोमनाथ व्यवहारे, तालुका विधी सेवा समितीचे अॅड. अनुप ठोळे, अॅड. राहुल वाघचौरे, अॅड. शीतल देशमुख, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, संजय पवार, गोपनीय विभागाचे राम खारतोडे, पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे, तुकाराम तुपे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश काकडे, प्रकाश कुंडारे, किशोर कुळधर, गणेश मैंड, यमनाजी सुंबे, श्रीकांत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...