आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:राहात्यात राधाकृष्ण विखे गटाचे वर्चस्व

राहाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने सरपंचपदासह निर्विवाद विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. राजुरी, नांदुर्खी बुद्रुक व नांदुर्खी खुर्द या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडले. अनेक ग्रामपंचायतीत अटीतटीच्या लढती झाल्या. मतमोजणीत अवघ्या २० मिनिटात पहिला निकाल नपावाडीचा घोषित झाला. अखेरचा निकाल साकुरी या तुल्यबळचा घोषित झाला.

खडकेवाके येथे संगीता मुरादे यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवला. नपावाडी - सरपंच पल्लवी राजेंद्र इल्हे, विखे काळे गटाचे ३, कोल्हे गटाचे ६ सदस्य. राजुरी - सत्तांतर हाेऊन जनसेवा मंडळाचे डॉ. सोमनाथ गोरे गटाचे सरपंचपदी संगीता जालिंदर पठारे व ९ जागा. सत्ताधारी गटाला २ जागा. डोऱ्हाळे - नवनाथ जनसेवा विकास मंडळाच्या सरपंच राधिका नवनाथ आंबेडकर व ६ सदस्य, जनसेवा मंडळाला ३ जागा.

नांदुर्खी बु. - सत्तांतर हाेऊन जनसेवा ग्रामविकास मंडळाचे माधव बाबुराव चौधरी सरपंच व ८ सदस्य. तर झोटिंग बाबा ग्रामविकास मंडळाचे ३ सदस्य. आडगाव खु. येथे सत्ताधारी जनसेवा मंडळ गटाचे सरपंचपदी अनिल सुभाष बर्डे व ४ सदस्य, तर विरोधी जय हनुमान सेवा मंडळाला ३ जागा.

निघोज - सत्ताधारी जनसेवा मंडळाचे सरपंचपद शोभा नवनाथ मोरे यांच्यासह ५, तर विरोधी जनसेवा विकास मंडळाला ६ सदस्य. नादुर्खी खुर्द - परिवर्तन हाेत सत्ताधारी गटाला एकही जागा मिळवता आली. सरपंचपदी आशा संजय आरणे व जनसेवा युवा विकास मंडळाला ८ जागा. खडकेवाके - सत्ताधारी जनसेवा मंडळाला सर्व जागा व सरपंचपदी संगीता सचिन मुरादे. रांजणखोल - सरपंचपदी शुभांगी बाबासाहेब ढोकचौळे, १३ पैकी ३ उमेदवार बिनविरोध, तर १० पैकी विखे ९ मुरकुटे गटाला, एक अपक्ष उमेदवार भैय्या पांडे हे विजयी.

सावळी विहीर बुद्रुक - सरपंचपदी ओमेश साहेबराव जपे, १५ जागांवर याच गटाचे वर्चस्व. साकुरी - सरपंचपदी मेघना संदीप दंडवते व ११ सदस्य, जयराज दंडवते गटाचे ३ सदस्य विजयी, तर जनसेवा ग्रामविकासला ३ जागा. लोहगाव - सरपंचपदी शशिकांत मिलिंद पठारे हे बिनविरोध.

बातम्या आणखी आहेत...