आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकाने पाण्याखाली:नगरमध्ये पावसाने उडवली दाणादाण; रस्त्यावर असलेली दुकाने पाण्याखाली

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरात शनिवारी साडेअकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवली आहे. तब्बल दीड तास मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे उपनगरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनीतील रस्त्यावर असलेली दुकाने पाण्याखाली गेली होती.

नगर शहरातील सर्जेपूरा, दिल्ली गेट चौपाटी कारंजा, माळीवाडा यासह सावेडी, भिंगार, केडगाव, नवनागापूर पाइपलाइन रोड तपोवनरोड या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यावसायिकांची मोठी दाणादाण उडाली. शहरातील ‌ एकविरा चौकात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भाजीविक्रेत्यांची देखील धावपळ उडाली.

शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील व उपनगरांतील रस्त्यावर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनीत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर असलेली दुकाने पाण्याखाली गेली होती. प्रेमदान चौक पाण्याखाली होता. त्यामुळे वाहन चालकांना या चौकातून वाहने काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, नगर जिल्ह्यात आतापर्यंत २३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...