आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यात जून महिन्यातील मान्सूनच्या २० दिवसांपैकी १८ दिवस हे कोरडे गेले आहेत.गेल्या वर्षी जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत २०जून अखेर पर्यंत ८८ मिलिमीटर पाऊस झाला होता.यंदा सोमवारपर्यंत (२० जून) केवळ तीन तालुक्यातच ३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मान्सूनचे मृगक्षत्र हे कोरडे गेल्याने चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी १ जूनपासूनच मान्सूनचा पाऊस आला सुरुवात झाली होती. यांना मात्र १ जून उलटल्यानंतर ७ जून जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ११ जूनला जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. १ जून ते २० जून पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात केवळ दोन दिवसच पाऊस झाला आहे. उर्वरित नक्षत्र मात्र कोरडे गेले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सोमवार २० जून अखेरपर्यंत ३९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ८८.१ मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात ४९ मिलिमीटर पावसाची तूट आहे. जिल्ह्यात केवळ पारनेर, जामखेड, पाथर्डी याच तीन तालुक्यात ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद आहे. उर्वरित तालुक्यात मात्र ४० मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला आहे.
ढगाळ वातावरण पण प्रत्यक्षात पाऊस नाहीच अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी ढगाळ वातावरण होते प्रत्यक्षात मात्र पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यात २० जून अखेरपर्यंत पाऊस नगर-४५ , पारनेर ५९, श्रीगोंदे ३७, कर्जत ११, जामखेड ५४, शेवगाव ३७, पाथर्डी ७७, नेवासे ४०, राहुरी ३९, संगमनेर ३७, अकोले ३१ , कोपरगाव २६, श्रीरामपूर २४, राहता १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.