आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य रस्त्यावरील व अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आणत दिव्य मराठीने वारंवार या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. श्रीरामपुरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण प्रश्न ऐरणीवर, तसेच २० नोव्हेंबर रोजी व नको फक्त नोटिसांचा फार्स ! हवा आहे कारवाईचा टास्क अशा आशयाचे वृत्त ३० नोव्हेंबर रोजी प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
त्यावर प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी याबाबत लवकरच उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासीत केले होते. त्यानुसार बुधवार दि ७ पासून नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता राम सरगर, आनंद शेळके,अतिक्रमण विभागाचे संजय शेळके आदींसह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात मेनरोड, शिवाजी रोड, नेवासा रोड, संगमनेर रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. इतर अनेक उपरस्ते जोडलेले आहेत. या रस्त्यांवरूनही मोठी वाहतूक आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व खरेदीसाठी अथवा कार्यालयात येणाऱ्या लोकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग असावी यासाठी पथमार्गा बाहेरच्या बाजूने नगरपालिका व पोलिस प्रशासनाने पांढरे पट्टे मारले आहेत.
या पट्टयाबाहेर वाहने लावली असतील तर दंडात्मक कारवाई केली जात होती. आधीच पोलीस बळ कमी त्यात वाहतूक शाखा बंद केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ज्या इमारतीमध्ये आहे तेथे पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने भर रस्त्यावर वाहने लावले जातात.त्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाची तपासणी करण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने पोलिस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढले जातील, असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.