आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा\अहमदनगर जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत पध्दतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केलेले नाही. त्यामुळे खर्डा जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला आरक्षण पडले आहे, अशी हरकत घेत खर्डा जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणात फेरबदल करण्याची मागणी भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविद्र सुरवसे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत ५ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
सुरवसे यांनी हरकतीत म्हटले आहे की, मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील एकूण जागांपैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणत जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय होतील.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता प्रभाग जाती निश्चित करताना प्रथम या निवडणुकीकरिता अनुसूचित व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित झालेले प्रभाग वगळण्यात यावेत त्यानंतर मागील निवडणुकांमध्ये ( सन २००२ , २००७ , २०१२ व २०१७ ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित झालेले प्रभाग वगळण्यात यावेत, असे करताना परिच्छेद क्र .६ व ७ मधील सूचना विचारात घ्याव्यात त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रभागांमधून सोडतीने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात यावेत. असे निवडणूक आयोगाचे आदेश असताना निवडणूक कार्यक्रम अधिकारी यांनी सन २००७ ला खर्डा जि.प. गटात सर्वधारण महिला असे आरक्षण नाही. निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे खर्डा गटाचे २०२२ जागेसाठी सर्वसाधारण हे आवश्यक होते परंतु निवडणूक कार्यक्रम अधिकारी यांनी चुकीच्या पध्दतीने आरक्षण काढले. यामुळे सुरवसे यांनी हरकत नोंदवली आहे.स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.