आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरीत 8 शतकांपूर्वीच्या मंदिराचा होणार जिर्णोद्धार:6 कोटी रुपये येईल खर्च; पहिल्या दिवशी 50 लाखांची वर्गणी जमा

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे चैतन्य कानिफनाथांचे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी स्वरूपात करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी 50 लाख रुपयांची वर्गणी झाली, अशी माहिती कान्होबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक झाडे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे रघुनाथ महाराज उंबरेकर, महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व मिराबाई महाराज मिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने चैतन्य कानिफनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व भूमिपूजन सोहळा गुरुवारी सकाळी विविध संत महंत नाथ संप्रदायातील साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पहाटे चैतन्य कानिफनाथांचा अभिषेक महापूजा झाल्यानंतर उपस्थित संत मंडळींनी या नव्याणे उभारल्या जाणाऱ्या मंदिराच्या बांधकामाला शब्द रूपांनी आशीर्वाद दिले. यावेळी मिराबाई महाराज म्हणाल्या, प्रत्येक प्रांतात एखादा तरी महात्मा जन्माला येतो व त्या राज्याचे भविष्य घडवून जातो महाराष्ट्रात अनेक महात्मे जन्माला आली आणि या महाराष्ट्राला सुसंस्कृत घडवण्याचे काम याच महात्म्यामुळे झाले आहे.

नगर जिल्हा नाथांच्या पदस्पर्शाने पवित्र झाला चैतन्य मच्छिंद्रनाथ कानिफनाथ गोरक्षनाथ मिनीनाथ ही नाथपंथी मंडळी नगर जिल्ह्यात स्थिरावल्याने आपणा सर्वांचे मोठे भाग्य फळा आले आहे.

नवव्या शतकात नाथपंथांचे गावात वास्तव्य

नवव्या शतकात नाथपंथांनी या गावात वास्तव्य केले होते ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावातील काही व्यक्तींना पुर्वी जेलमध्ये जाण्याची देखील वेळ आली. परंतु सर्व भाविकांची इच्छा नाथांच्या आशीर्वादामुळे आता पूर्णत्वास येणार आहे. लोकसहभागातून याठिकाणी मोठ्या दिमाखात मंदिर उभे राहील, असा विश्वास मिराबाई यांनी व्यक्त केला.

मिरी हे गाव माझ्यासह कुंदनऋषीजी महाराज, छगन महाराज यांची जन्मभूमी आहे तर राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराज यांची दीक्षाभूमी आहे त्यामुळे या गावाला वारकरी सांप्रदायाचा एक वारसा निर्माण झालेला आहे. असे मिराबाई महाराज मिरीकर यावेळी म्हणाल्या.

ग्रामस्थांचे परमार्थिक कार्यात योगदान

आदिनाथ महाराज शास्त्री, छगन महाराज मालुसरे म्हणाले, हा भाग जरी दुष्काळी असला तरी मिरी गावच्या लोकांचे परमार्थिक कार्यात मोठे योगदान राहिले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मौनीबाबा महाराज, मठाधिपती राष्ट्रसंत महंत योगी रमेशगिरी महाराज, छगन महाराज मालुसरे, दत्तगिरी महाराज, आदिनाथ महाराज शास्त्री, सोपान महाराज जोगदंड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, माजी सभापती संभाजी पालवे, चेअरमन चारुदत्त वाघ, रमेश ताठे, सुभाष ताठे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, सरपंच सुनंदा गवळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...