आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:महसूलने तस्करांवर कारवाई करत वाळू साठे केले उदध्वस्त

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल पथकाने गंगामाई घाटावर वाळू वाहतूक करणाऱ्या २ रिक्षांवर कारवाई करत गुरुवारी सकाळी ताब्यात घेतल्या. खबऱ्याने विनानंबरची दुचाकी सोडून पळ काढल्याने ती देखील ताब्यात घेण्यात आली. त्याचा शोध सुरु आहे. तर गोण्यात भरलेले वाळू साठे पथकाने जप्त करत आग लावून नदीपात्रात नष्ट केले.

वाळू तस्करीवर शासनाने कठोर निर्बंध लादत बंदी आणली असली तरी चोरटी वाळू वाहतूक थांबता थांबेना. कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रवरा, मुळा व म्हाळुंगी पात्रातून वाळू तस्करी होताना दिसते. महसूल प्रशासनाला कल्पना असूनही कारवाई होत नाही. जास्त चर्चा झाली तर वाहनांवर धातुर-मातुर कारवाई केली जाते. वाळू तस्करीत महसुलचे कर्मचारी बरबटले आहेत.

वाळू तस्करांची व त्यांची मिली भगत असल्याची चर्चा आहे. खुलेआम तालुक्यातील तीनही नद्यांतून वाळू उपसा होत आहे. याकडे महसुलचे दुर्लक्ष आहे. एखादी कारवाई करून नागरिकांचे लक्ष विचलित केले जाते. मात्र, ठोस कारवाई होताना दिसत नाही. वाळू तस्करीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. प्रवरा पात्राची दुर्दशा झाली आहे. पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. याकडे पर्यावरण प्रेमी व नागरिक गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. वाळू तस्करीवर आवाज उठवला तर तो दाबला जातो. सामाजिक कार्यकर्ते व पुढारी यांचा या व्यवसायात सहभाग असतो. अनेकदा वाळू तस्करांमध्ये वाद होताना दिसतात. नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दादागिरीला तोंड द्यावे लागते.

वाळू तस्करांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने गुन्हेगारी फोफावत आहे. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खबऱ्या मार्फत पाळत ठेवून मिशन राबवले जात आहे. सध्या विनापरवाना रिक्षा व गाढवांवरून नदीला पाणी असतानाही वाळू तस्करी सुरु आहे. चढ्या भावाने विक्री होत असल्याने या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होते.

वाळू तस्करीसाठी रिक्षा भंगारातून कमी किंमतीला आणल्या जातात. काहींवर नंबर नसतात. कारवाईत मोठा दंड आकाराला जात असल्याने रिक्षा सोडवल्या जात नाही. काही रिक्षा तर तहसील आवारातून पळवून नेल्याच्या घटना ताज्या आहेत. दरम्यान कारवाईत पकडण्यात आलेल्या सर्व वाहनांची भंगारात विक्री केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...