आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेळसांड:कौठे मलकापूर ते शिबलापूरपर्यंतच्या रस्त्याला निधी मंजूर होऊनही दुरवस्था

पिंपरणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील पूर्व व पठार भागातील महत्वाचा समजला जाणारा शिर्डी ते पुणे ६७ क्रमांकाच्या राज्य महामार्गावरील पानोडी घाटासह कौठे - मलकापूर ते शिबलापूर पर्यतचा १४ किमीचा खड्डेमय व अरुंद रस्ताच्या कामाला मंजुरी असताना गेल्या दीड वर्षभरात रस्त्याच्या कामाला मुर्हुतच न मिळाल्याने प्रवाशांवर काय रस्ता, काय खड्डी, काय धूळ ही म्हणण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांसह प्रवाशाचे अतोनात हाल होताना दिसत अाहेत. रस्ता डूलतो की, वाहने डूलतात हेच समजेनासे झाले असून हाच का? बांधकाम विभागाचा अजब कारभार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

राज्य महामार्ग क्रमांक ६७ हा शिर्डी ते पुणे घोषित झाला बहुतांश रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र पानोडी घाटासह स्थापलिग घाट ते हनुमंत नाका, शिबलापूर ते पानाेडी घाट पायथ्यापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीस मुर्हुतचे सापडेना. तालुक्यातील पूर्व भागावर राज्य पातळीवरील वजनदार दोन नेत्याचा वरचष्मा असताना सुद्धा मंजूर असलेला रस्ता अजूनही दुरुस्त होईना. कौठे - मलकापूर येथे पाच वर्षांपूर्वी सुुरू झालेल्या साखर कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ निर्माण झाल्याने अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होऊ लागल्याने श्रीगजानन शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाने रस्ता खराबीमुळे होणारे अपघात, लोकांना होणारा त्रास ओळखून पानोडी घाट दुरुस्त व घाटाच्या पुढे-मागे असणारा १० किमीचा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा म्हणून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यशही आले. या रस्त्याकरिता ५ कोटी मंजूर करण्यात आले. मात्र गेल्या दीड वर्षामध्ये रस्त्याला बांधकामाच्या हलगर्जीपणामुळे मुर्हुतच सापडला नाही, अशी अवस्था आहे.

हनुमंत नाका ते स्थापलिग घाट व शिबलापूर ते पानोडी घाट पायथ्यापर्यत १० किमी अंतर असून हा अरुंद रस्ता असून बहुतांश ठिकाणी दयनीय झाला. काळूबाईचा ओढ्यात दोन्ही बाजूला चढ असल्याने छोट्याश्या पुलावर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे रस्ता कोठे आहे हेचं दिसत नाही. त्यामुळे काळूबाईच्या ओढ्यात मोठा पूल होणे आवश्यक आहे. मोठ मोठे पडलेले खड्डे हे बांधकाम विभागाने डांबरीकरणाने बुजवण्याची आवश्यकता असताना त्याकडे मात्र बांधकाम विभागाने कानाडोळा केल्यामुळे शालेय विद्यार्थी, प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत अाहे.

पानोडी घाटासह रस्ता दुरुस्तीसाठी तत्कालिन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ५ कोटींचा निधी जुलै महिन्यात मंजूर केला. मात्र बांधकाम विभाग या कामाकरिता का विलंब करत आहे हेचं कळनासे झाले आहे. पानोडी, वरवंडी, कौठे मलकापूर, खरशिदे, दरेवाडी, खांबे, ठाकरवाडी, कुंभारवाडी, चौधरवाडी आदी गावांतील लोकांना व प्रवाशांना मोठा त्रास होताना दिसत आहे. आक्राळ - विक्राळ रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

दुरस्तीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठणार
राज्यात शिदे - फडणवीस सरकार आल्याने श्रीगजानन महाराज साखर कारखान्यासह परिसरातील लोकांना हा रस्ता त्वरित दुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. आता रस्ता दुरुस्ती करिता प्रतीक्षा नव्हे, अपेक्षा लागली असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे रवींद्र बिरोले यांनी सागितले.

बातम्या आणखी आहेत...