आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Road Work On Kalyan Road Has Finally Started, The Contractor Was Not Ready To Work Even After Following Up With The Administration From Time To Time | Marathi News

दुर्लक्ष:कल्याण रोडवरील रस्त्याचे काम अखेर सुरू, प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा करूनही ठेकेदार काम करण्यास तयार नव्हता

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीना नदीवरील पुलावर खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत होते. प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा करूनही ठेकेदार काम करण्यास तयार नव्हता. याबाबत पाठपुरावा केल्यानंतर अखेर सीना नदीवरील पुलावरील रस्त्याचे काम सुरू झाल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे यांनी दिली.

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात आहे. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला असतानाही प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अर्धवट अवस्थेत रस्त्याचे काम रखडले आहे. नदी पुलावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ज्या कामासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता रस्त्याचे काम सुरू झाले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...