आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक उन्नती:शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत सोसायट्यांचा मोलाचा वाटा ; संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे प्रतिपादन

कोपरगाव शहर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारी सोसायटया हया शेतक-यांच्या विकासाच्या धमन्या असुन त्यांच्या आर्थीक उन्नतीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. तालुक्यातील सुरेगांव सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाल्याबददल त्यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलास वाबळे यांनी प्रास्तविक केले. माजी संचालक मोहन वाबळे यांनी कोल्हे कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली. याप्रसंगी विजयी संचालक विलास वाबळे, गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपान कदम, शंकर कदम, कुमार मेहेरखांब, कुसुम वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांचा सत्कार करण्यांत आला.

बातम्या आणखी आहेत...