आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा आज निकाल:ऑनलाइन अभ्यास करून ऑफलाइन परीक्षा दिलेल्या 64 हजार विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; 17 ला मिळणार गुणपत्रक

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ६४ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मंडळाने या परीक्षेचा निकाल बुधवारी (८ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. सात संकेतस्थळांवर हे निकाल ऑनलाइन पाहता येणार आहेत. तर गुणपत्रक संबंधित महाविद्यालये व शाळांत १७ जूनला दुपारी ३ वाजता वाटप होईल.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर ऑनलाइन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या ऑफलाइन परीक्षा दिल्या. या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत झाल्या. जिल्ह्यातील १७९ केंद्र, उपकेंद्र ९५० उपकेंद्र व १ हजार १६ शाळांत तब्बल ६४ हजार ४७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा कालावधीत कॉपीसारखे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, मनपाचे प्रशासन अधिकारी, यांचे भरारी पथक नेमले होते. तसेच गणित, इंग्रजी विषयाच्या पेपरचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे नियोजन आखले होते.

बुधवारी जाहीर केलेल्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी उत्तीर्ण होणार याकडे लक्ष लागले आहे. निकालानंतर प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू होणार आहे.

याबाबत विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेच्या पुनऱ्मुल्यांकनासाठी ऑनलाई अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर करता येणार आहेत. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायांकीत प्रत घेणे अनिवार्य आहे. तसेच जुलै व ऑगस्टमध्ये आयजित पुरवणी परीक्षेसाठी पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (१० जून) मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहेत.

या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल
www.mahresult.nic.in , www.hscresult.mkcl.org , https://hsc.mahresults.org.in यासह सात संकेत स्थळांची यादी माध्यमिक शिक्षक मंडळाने जारी केली आहे. या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...